PHOTOS : तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव; चौथ्या माळेला देवीचा सिंह या वाहनावरून छबिना
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची शुक्रवारी चौथी माळ झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजाभवानी मातेची सकाळी शेषशाही अलंकार महापूजा झाली.
सायंकाळी प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर रात्री सिंह या वाहनावरून छबिना काढण्यात आला.
मोठ्या प्रमाणात भाविक-भक्तांची यावेळी उपस्थिती होती.
या नवरात्रौत्सवात देवीच्या विविध रूपातील पाच अलंकार महापूजा आणि दररोज सायंकाळी मंदिर परिसरात मातेची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शिवाय या नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण समजला जाणारा जलयात्रेच्या मिरवणूकीचा सोहळा शनिवारी, 11 जानेवारीला पार पडणार आहे.
गेल्या आठ दिवसांपासून या नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी सुरू होती.
स्थानिक तिन्ही पुजारी संघटना एकत्रित येऊन मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव भक्तीभावाने साजरा करतात.
यावर्षी शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमानपद पाळीकर पुजारी संघटनेला मिळाले आहे.
यामध्ये मंदिर संस्थानही महत्वाची भूमिका बजावणार आहे.