Mukesh Ambani : अंबानी कुटुंबियांचं शिक्षण किती? तुम्हांला माहितीय? नसेल तर वाचा सविस्तर...
देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय यांचं शिक्षण किती याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, तर याचं उत्तर आज जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांना तीन मुलं आहेत. सर्वात मोठा आकाश अंबानी, त्यानंतर मुलगी ईशा अंबानी आणि सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी.
मुकेश अंबानी आणि कुटुंबियांचं शिक्षण किती जाणून घ्या.
मुकेश अंबानी हे स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांचे मोठे सुपुत्र. मुकेश अंबानी यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच पूर्ण झालं. अंबानी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या नीता अंबानी यांचा विवाह मुकेश अंबानी यांच्याशी 1985 मध्ये झाला. त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे.
आकाश अंबानी मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आहे. आकाश अंबानीने याआधी जिओ इन्फोकॉम कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी ही सांभाळली होती. आकाश अंबानीचा जन्म मुंबई झाला. त्याचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून येथे झालं आहे. त्यानंतर आकाशने ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली.
मुकेश अंबानी यांची थोरली सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताही उच्च शिक्षित आहे. श्लोका मेहताने आकाशसोबत धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तिने प्रिन्स्टन विद्यापीठातून उच्च शिक्षण केलं. यानंतर श्लोका मेहताने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यानेही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अनंत अंबानी पदवी शिक्षण पूर्ण केलं. ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर तो रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाला. सुरुवातीला अनंत अंबानीने जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डवर जबाबदारी देण्यात आली होती.
सध्या अनंत अंबानीच्या खांद्यावर रिलायन्सचा ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे. अनंत अंबानी इंडियन प्रीमियर लीग (IPL-Indian Premier League) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (MI-Mumbai Indians) सह-मालक देखील आहे. मुकेश अंबानी याची होणारी धाकटी सून म्हणजे अनंतर अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ईशा अंबानीच्या खांद्यावर रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे. ईशा अंबानीने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही पूर्ण केली आहे.
ईशा अंबानीचा पती आणि अंबानी कुटुंबाचा जावई आनंद पिरामल हे उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आहे. आनंद पिरामलने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आनंद पिरामलने फिलाडेल्फिया (USA) येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली त्यानंतर बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पूर्ण केलं आहे.