Skin Care: 'या' कारणांमुळे येतात डोळ्याखाली डार्क सर्कल; 'हे' उपाय करुन मिळवा सुटका
लॅपटॉप टीव्ही, मोबाईल जास्त बघण्यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रमाणापेक्षा अधिक तणावात राहण्याने डार्क सर्कल येतात.
झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते, ती पूर्ण न झाल्यास डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात.
अनेक कॉस्मेटिक्समुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात.
image 1
सनस्क्रीन न वापरल्यास डोळ्याखालील त्वचेचं संरक्षण होत नाही आणि काळी वर्तुळं पडतात.
आहारात मिठाचं प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पेशी पाणी धरुन ठेवतात. यामुळे डोळ्याखालील त्वचा अधिक पातळ होते आणि काळी पडते.
धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, डोळ्यांखालीही काळी वर्तुळं पडतात.
आजारपणामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात.
डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एलोवेरा फायदेशीर मानलं जातं.
कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात.
लिंबाचा रस रोज कापसाने डोळ्यांखाली लावल्याने फरक जाणवू शकतो. रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्यास डार्क सर्कल नष्ट होऊ शकतात.