Maharashtra Budget :लाडकी बहीण ते मुंबई ठाणे,नवी मुंबईतील पेट्रोल डिझेलवरील करकपात, अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत असल्याची घोषणा केली. याअंतर्गत महिलांना दीड हजार दरमहा दिले जाणार आहेत. यासाठी ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येकी वारीला २० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील. बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार निधी देण्यात येईल.यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे.
विविध शैक्षणिक संस्था पदवी, पदव्युत्तर यापुढील शिक्षणाकरता १० लाख युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली गेल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान १ जुलैपासून देण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे , नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री करात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळं पेट्रोलच्या दरात 65 पैसे कमी होतील. तर डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात होणार आहे.