WI Squad vs Ind Tour : निवृत्तीची घोषणा केल्यानंतरही संघात निवड! भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
वेस्ट इंडिजच्या महिला संघाला भारत दौऱ्यावर जायचे आहे, जिथे भारतीय महिला संघाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. डिसेंबरमध्ये हा दौरा होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता यासाठी वेस्ट इंडिजच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी हेली मॅथ्यूजकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. शमाईन कॅम्पबेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
तर, वेस्ट इंडिजची स्टार खेळाडू डिआंड्रा डॉटिनने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर, ती निवृत्तीतून परतली आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळली.
आता भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात तिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर ती आता प्रथमच एकदिवसीय संघात परतली आहे.
तिने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च 2022 मध्ये खेळला होता. तिने वेस्ट इंडिजसाठी 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3727 धावा आणि 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2817 धावा केल्या आहेत.
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा एकदिवसीय आणि टी-20 संघ - हेली मॅथ्यूज (कर्णधार), शमायन कॅम्पबेल (उप-कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, अफी फ्लेचर, शाबिका गझनबी, चिनेल हेन्री, जैदा जेम्स, कियाना जोसेफ, मँडी मंगरू, अश्मिनी मुनीसर, करिश्मा रामहर रशादा विल्यम्स