आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दमदार परतावा, 'या' बँका देतायत एफडीवर 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज!
सध्या वेगवेगळ्या पाच बँका आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर आकर्षक व्याज देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अशा काही बँका आहेत, ज्या एफडीवर साधारण 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना एफडीवर 8.75 टक्के व्याज देत आहेत.
यूनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना एफडीवर 8.65 टक्के व्याज देत आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सिनियर सिटिझन्स ना एफडीवर 8.35 टक्के व्याज देत आहेत. ही ऑफर पाच वर्षांच्या एफडी योजनेवर लागू आहे.
AU स्मॉल फायनान्स बँक आपल्या सिनियर सिटिझन्स असलेल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सिनियर सिटिझन्सना एफडीवर 7.70 टक्के व्याज देत आहेत.