पैसे ठेवा तयार! 19 डिसेंबरला येणार 2 बम्पर IPO, भरपूर पैसे कमवण्याची नामी संधी?
येत्या 19 डिसेंबर रोजी एकूण दोन आयपीओ येणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना पैसे कमवण्यासाठी 19 डिसेंबर हा दिवस चांगला ठरू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App19 डिसेंबर रोजी ममता मिशनरी आणि ट्रान्सरेल लायटिंग हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
या दोन्ही आयपीओंत 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळात गुंतवणूक करता येईल.
ममता मिशनरी या आयपीओचा किंमत पट्टा 230 ते 243 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांडे गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 14,823 रुपये असणे गरजेचे आहे.
तर ट्रान्सरेल या आयपीओत एकूण 400 कोटींचे फ्रेश शेअर्स असतील. 27 डिसेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. 24 डिसेंबर रोजी या आयपीओचे शेअर अलॉट होतील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)