नवा आयपीओ आला रे आला! जाणून घ्या प्राईस बँड किती? गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख काय?

सध्या स्विगी या आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. मात्र स्विगीसोबतच या काळात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. या कंपनीचे नाव सॅजिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या कंपनीच्या साईझ एकूण 2,107 कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओसाठी किंमत पट्टा 28-30 रुपये प्रति शेअर असा ठेवला आहे.

येत्या 5 नोव्हेंबरपासून या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. 7 नोव्हेंबरी ही आयपीओत गुंतवणुकीची शेवटची तारीख आहे.
ही कंपनी आपल्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून करणार आहे. यावेळी एकूण 70.22 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
या आयपीओतून विकले जाणारे सर्व शेअर्स हे ऑफर फॉर सेल आहेत. म्हणजेच आयपीओतून उभा राहिलेला निधी कंपनीला मिळणार नाही. हा निधी कंपनीतीला भागधारकांना मिळणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)