KRN Heat Exchanger IPO:केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ग्रे मार्केटमध्येही बोलबाला
केआरएन हीट एक्सेंजर अँड रेफ्रिजरेशन कंपनीचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी आज खुला झाला. यामध्ये गुंतवणूक 27 तारखेपर्यंत करता येईल. आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या काही तासातच 15 पट सबस्क्रीप्शन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेआरएन हीट एक्स्टेंजर आयपीओतून उपलब्ध होणाऱ्या पैशाचा वापर त्यांच्या उपकंपनीसाठी वापरणार आहे. नवं उत्पादन यूनिट राजस्थानमध्ये उभारलं जाणार आहे.
केआरएन हीट एक्सेंजर या कंपनीनं 342 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारण्याचं निश्चित केलं आहे. आयपीओपूर्वी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून 100.10 कोटी रुपये उभे केले आहेत.
आयपीओद्वारे 1.55 कोटी शेअर्स इशू केल जाणार आहेत. याच्या शेअरची इशू किंमत 209 ते 220 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 65 शेअर असतील. त्यामुळं रिटेल गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असल्यास 14300 रुपये भरावे लागतील.
केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये देखील चर्चा आहे. केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताना त्याची एका शेअरची किंमत 459 रुपये असू शकते, असा अंदाज ग्रे मार्केटचा आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)