Fixed Deposit: मुदत ठेवीवर 'या' दोन बँकांकडून 9 टक्के व्याज दर
मुदत ठेव (Investment Fixed Deposit) ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Investment) मानली जाते. गुंतवणुकीसाठी इतर पर्याय असतानादेखील अनेकजण मुदत ठेवीसाठी प्राधान्य देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्त व्याज देतात. दोन बँकांकडून मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज दर दिला जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस अंकांची वाढ केली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 6 डिसेंबरपासूनच लागू झाले आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज दर लागू केला आहे.
बँकेने 15 दिवसांच्या मुदतीसह 5 वर्षांच्या मुदत ठेवीची ऑफर सुरू केली आहे.
या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यास सर्वसामान्यांना 9.01 टक्के दराने व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज मिळणार.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँकेकडून मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.5 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे.
बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सध्या ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त, इतरांना 181 दिवसांसाठी मुदत ठेवीवर 8.50 टक्के दराने व्याज देण्याची घोषणा बँकेने केली आहे.