नोकरीतील निवृत्तीनंतर गुंतवणूकीचे पर्याय...
जर तुम्ही नोकरीतून निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर 'हे' आहेत काही गुंतवणूकीचे पर्याय.. हे पर्याय तुम्हांला निवृत्तीनंतर योग्य मिळकत देण्यास मदत करतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटल पेंशन योजना: ही एक अशी योजना आहे, जी तुम्हांला दर महिना 1000 रुपये ते 5 हजार रुपायांपर्यंत मिळकत देईल.
या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील लोकं घेऊ शकतात. योजनेतील मिळकतीचा लाभ वयवर्षे 60 नंतर मिळतो
जेष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पोस्ट ऑफीसमध्ये खाते उघडले जाऊ शकते.
या योजनेअंर्तगत 30 लाखांपर्यंत गुंतवणूक मिळकत मिळू शकते. या योजनेअंर्तगत तुम्हांला वयाच्या 60 नंतर दरमाहा ठरावीक रक्कम मिळते.
पोस्ट ऑफिसच्या दरमाहा मिळकत योजनेमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेअंर्तगत तुम्ही 1 हजारांपासून गुंतवणूक करून 9 लाखांपर्यंत फायदा घेऊ शकता.
राष्ट्रीय पेन्शन : योजनेअंर्तगत 1 हजारांपासून गूंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत दोन टप्प्यात खाते उघडले जाते.
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन : योजनेअंतर्गत मिळकतीचा लाभ मिळतो. इक्विटी फंडच्या आधारावर यातून मिळकत मिळू शकते.