IPL 2023 : आयपीएलमधील LED स्टंपची किंमत माहितीय? रहाणेच्या आयपीएलमधील मानधनापेक्षाही महाग
सध्या आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम सुरु आहे. 31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंची लिलावामध्ये लाखो-करोडो रुपयांची बोली लागली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सर्वत्र आयपीएल फिवर पाहायला मिळत आहे. टी 20 च्या या झगमगाट एका गोष्टीकडे तुमची नजर नक्कीच गेली असेल, ती वस्तू म्हणजे एलडईडी स्टंप. या एलईडी स्टंपची किंमत तुम्हाला माहिती आहे का, नसेल तर येथे जाणून घ्या.
एखाद्या साध्या स्टंपप्रमाणे दिसणारे हे स्टंप दिसायला जरी साध्या स्टंपप्रमाणे दिसत असले, तरी त्याची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल.
आयपीएलमध्ये वापरले जाणारे एलईडी स्टंप खूप महाग आहेत. अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील पगारापेक्षा या स्टंपची किंमत खूप जास्त आहे. इतकंच नाही, तर या स्टंपची किंमत 'प्लेअर ऑफ द मॅच'च्या बक्षीस रकमेपेक्षा 50 ते 70 पट जास्त आहे.
एलईडी स्टंपचा (LED Stump) एक संच (Set) सुमारे 25 ते 35 लाख रुपये किंमतीचा असतो. म्हणजेच, एका सामन्यात वापरलेले दोन्ही सेटची किंमत 50 ते 70 लाखांच्या दरम्यान आहे.
एलईडी स्टंपची किंमत विविध देशांमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे काही देशांमध्ये त्यांच्या किमतीत थोडा फरक दिसून येतो. आयपीएलमध्येही हेच एलईडी स्टंप वापरले जातात.
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे आयपीएल पगार 50 लाखांपेक्षा कमी आहे. यात अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. अशा स्थितीत स्टंपची किंमत एखाद्या खेळाडूच्या वर्षभराच्या आयपीएल पगारापेक्षा जास्त आहे, ही आश्चर्याची बाब आहे.