Shani 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर होणार राहु-शनीची युती; नवीन वर्षात 3 राशींना सोन्याचे दिवस, बक्कळ धनलाभाचे संकेत
Shani Rahu Yuti : 2025 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होत आहेत. याद्वारे हे ग्रह अनेक शुभ-अशुभ योग निर्माण करतील. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, राहु सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे आणि कर्म दाता शनि 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा वेळी, या दोन ग्रहांच्या युती होणार आहे, ज्यामुळे पुढे 3 राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनि यांची युती फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल.
स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट किंवा इतर गुंतवणूक पर्यायांद्वारे तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नाचं स्रोत वाढू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, व्यावसायिकांना मोठा फायदा मिळू शकतो.
मीन रास (Pisces) : राहू आणि शनि यांची युती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या चढत्या घरावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारेल. तसेच, यावेळी तुमचं सोशल सर्कल वाढेल आणि तुम्ही काही नवीन संपर्क देखील निर्माण कराल.
नवीन वर्षात तुम्हाला व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तसेच, विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकतं.
मिथुन रास (Gemini) : राहू आणि शनीची युती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या कर्म घरावर घडणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच . नोकरीत प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल.
व्यवसायाचा विस्तार होईल आणि नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील. उत्पन्न वाढेल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नाते मजबूत राहील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.