व्यवहार करताना आयुष्यात करू नका 'या' पाच चुका, अन्यथा आयटी विभागाची नोटीस आलीच म्हणून समजा!
आज डिजिटलचा जमाना असला तरी अनेक लोकांना अजूनही रोख रक्कम देऊनच व्यवहार करायला आवडतो. काही लोक तर कर वाचवण्यासाठीदेखील रोख रक्कम देऊन व्यवहार करतात. पण अशा प्रकारचा व्यवहार कधीकधी फार अडचणीचा ठरू शकतो. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक व्यवहारावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर अशते. रोख रक्कम देऊन छोटे-मोठे व्यवहार केल्यास काही अडचण येत नाही. पण प्राप्तिकर विभागाच्या दृष्टीकोनातून असे पाच हाय व्हॅल्यू ट्रान्झिशन्स असतात, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला थेट प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नियमानुसार एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख रक्कम बँकेत जमा करत असेल तर याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते. हे पैसे एक किंवा एकापेक्षा जास्त बँक खात्यात जमा केलेले अशू शकतात. अशा प्रकारचा व्यवहार आढळल्यास प्राप्तिकर विभाग तुमच्या या पैशांची चौकशी करतो.
एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा केल्यास चौकशी होते, अगदी त्याच पद्धतीने एफडीमध्येही चौकशी केली जाते. तुम्ही एक किंवा एकापेक्षा अधिक एफडी खात्यात एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला या पैशांचा स्त्रोत विचारला जातो. प्राप्तिकर विभाग तुम्हाला नोटीस देऊ शकतो.
एखादी जमीन, घर किंवा अन्य प्रॉपर्टी करेदी करताना 30 लाखांपेक्षा जास्त पैसे रोख स्वरुपात दिल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता. अशा स्थितीत रजिस्ट्रार तुमच्या या ट्रान्झिशन्सची माहिती प्राप्तिकर विभागाला देतो. एवढा मोठा व्यवहार रोख पैशांनी झाल्यामुळे प्राप्तिकर विभाग तुमची चौकशी करू शकतो.
क्रेडिट कार्डचे बील देण्यासंदर्भातही असाच नियम आहे. तुम्ही एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे बील रोख रक्कम देऊन केले तर तुमची प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून चौकशी केली जाऊ शकते. तुम्ही क्रेडिट कार्डवर एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक बील देत असाल तर प्राप्तिकर विभाग तुमची चौकशी करू शकतो.
शेअर, म्यूच्यूअल फंड, डिबेंचर किंवा बॉन्ड खरेदी करताना तुम्ही मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर केल्यास तुमची चौकशी होऊ शकते. या परिस्थितीत तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरपात दिल्यास तुमची चौकशी होऊ शकते.