या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!
![या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा! या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/26/b821d4d2aabaa3600eb27a5873371218c3139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
Ex-Dividend Stocks: डिव्हिडेंडच्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. कारण या आठवड्यातही अनेक शेअर्स एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत. त्याआधी गुंतवणूक करून गुंतवणूकदार पैसे कमवू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा! या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/26/c2c2c75e8481dc031317973812f74b71bebff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 27 मे रोजी स्टोवेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा शेअर एक्स-डिव्हिडेंड होणार आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 115 रुपये प्रति शेअरप्रमाणे अंतरिम लाभांश दिला जाईल.
![या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा! या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/26/6432be0a22454b21e634be7b93fbb22c78218.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
28 मे रोजी सीएमएस इन्फो सिस्टिम्स आणि ट्रायडेंट लिमिटेड या दोन्ही कंपन्या एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी क्रमश: 3.25 रुपयांचा अंतिम लाभांश आणि 0.36 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
30 मे रोजी जीपीटी इन्फाप्रोजेक्ट्स कंपनीचा शेअर एक्स-डिव्हिडेंड होणार आहे. या घोषणेनुसार गुंतवणूकदारांना 1 रुपयांचा अंतरिम लाभांश दिला जाईल. या दिवशी एलटीआय फूड्सचा शेअरही एक्स डिव्हिडेंड होणार असून या कंपनीने 0.50 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दहा पेक्षा अधिक कंपन्या एक्स डिव्हिडेंट होणार आहेत. यामध्ये इन्फोसिस या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीने 8 रुपयांचा विशेष लाभांश तर 20 रुपयांचा फायलन डिव्हिडेंड देण्याची घोषणा केलेली आहे.
यामध्ये मुथूट फायनान्स (24 रुपये), पेज इंडस्ट्रीज, आयआयएक्स लिमिटेड (1.5 रुपये), हेवेल्स इंडिया (6 रुपये), ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मा (32 रुपये), कॅपलीन पॉईंट लॅब (2.5 रुपये) आणि एलिकॉन कास्टअलॉय (3 रुपये) या कंपन्यांचा समावेश आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
image 8