होम लोन, कार लोन घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यावर कर्जाचं पुढं काय होतं? बँक पैशांची वसुली कशी करते? 'या' व्यक्तीला जातो पहिला फोन!
अनेकजण घर घेण्यासाठी, कार घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी बँकांकडून कर्ज घेतात. मात्र कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास बँका नेमका काय करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर बँका सर्वांत अगोदर को-अॅप्लिकंटशी संपर्क साधतात. को-अॅप्लिकंटने कर्जाची फेड केली तर ठीक, अन्यथा बँका गॅरंटरशी संपर्क साधतात.
किंवा बँका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून कर्जाची परतफेड करण्यास विचारणा करतात.
चर्चेतून प्रश्न न सुटल्यास बँका कायदेशीर मार्गाचा अवलंब करून मृत कर्जदाराच्या कुटुंबीयांकडून कर्जाची वसुली करू शकतात.
या सर्व पर्यायांचा अवलंब करुनही कर्जाची परतफेड होत नसेल तर बँका मृत कर्जदाराची संपत्ती जप्त करतात. त्यानंतर जप्त केलेल्या संपत्तीची निलामी करून त्यातून कर्जाची रक्कम वसूल केली जाते.