22 व्या वर्षी लग्न, 24 व्या वर्षी आई, पाकिस्तानसह भारतातही 'या' अभिनेत्रीचे लाखोंनी चाहते; तब्बल 700 कोटींची आहे मालकीण
पाकिस्तानच्या अभिनेत्रींचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. या अभिनेत्रींचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. पाकिस्तानमधील हानिया आमीर, दूर ए फिशान यासारख्या अभिनेत्र्यांची चर्चा भारतात होतेच. पण अवघ्या 24 व्या वर्ष आई होणार्या आणखी एका अभिनेत्रीचेही भारतात लाखोंनी चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रीचे नाव इखरा अजीज असे आहे. या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात 2014 साली 'किस्से अपना कहें' या पाकिस्तानी टीव्ही शोपासून केली. त्यानंतर या अभिनेत्रीने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
या अभिनेत्रीने आतापर्यंत 20 पेक्षा अधिक पाकिस्तानी मालिकांत काम केलेले आहे. तिच्या या मालिकांना पाकिस्तानसोबतच भारतातही मोठी पसंती मिळालेली आहे.
तिचे सुनो चंदा, मन्नत मुराद आणि नुकतेच आलेल्या बर्न्स रोड के रोमियो जूलियट या सारख्या शोंना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
इकरा अजीजचा जन्म 24 नोव्हेंबर 1997 रोजी कराचीत झाला. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर तिला तिक्षण मध्येच सोडून द्यावे लागले.
सध्या 'बर्न्स रोड के रोमियो जूलियट' या टीव्ही शो मुळे इकर अजीज चांगलीच चर्चेत आहे. हा शो यूट्यूबवर मोफत पाहता येईल.
इखराने 2019 साली वयाच्या 22 व्या वर्षी पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसैन याच्याशी लग्न केले. यासीरने हम टीवी अवार्ड्स शो दरम्यान इकरा अजीलाल प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सध्या त्यांना एक मुलगा आहे. ती 24 व्या वर्षी आई झाली.
इकरा अजीजची संपत्तीदेखील कोट्यवधीच्या घरात आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती साधारण 700 कोटी रुपयांच्या घरात आहे, असे म्हटले जाते.
इकरा अजीज
इकरा अजीज