GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
GST Collection: डिसेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी झालं. 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.65 लाख कोटी रुपये होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग दहाव्यांदा जीएसटी कलेक्शन 1.77 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं. मात्र, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी कलेक्शन 2.1 लाख कोटी रुपये झालं होतं. गेल्या तीन महिन्यांतील जीएसटी वाढ कमी आहे. मात्र, गेल्या तिमाहीपेक्षा जीएसटी कलेक्शन चांगलं राहिलं.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीएसटीचं कलेक्शन सरासरी 1.82 लाख कोटी राहिलं. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरासरी कलेक्शन 1.77 लाख कोटी रुपये होतं. गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत 8.3 टक्के वाढ दिसून आली.
महाराष्ट्र राज्यातून जीएसटीचं कलेक्शन सर्वाधिक झालं. महाराष्ट्रातून 29260 कोटींचा जीएसटी जमा झाला. 2023 मध्ये जीएसटी कलेक्शन 26814 कोटी रुपये होते.
महाराष्ट्रानंतर जीएसटी सर्वाधिक जीएसटी जमा करणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक तामिळनाडू, गुजरात, हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागतो.