रवीना टंडनची मुलगी, सैफचा मुलगा या वर्षी 'हे' पाच स्टारकीड रुपेरी पडद्यावर झळकणार; नशीब साथ देणार का?
या वर्षी बॉलिवुडमध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. यंदा अनेक मोठ्या स्टार्सचे दमदार चित्रपट येणार आहेत. मात्र याच वर्षी एकूण पाच बड्या स्टार्सची मुलंदेखील रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. यामध्ये सैफ अली खानचा मुलगा, अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही या वर्षी डेब्यू करणार आहे. ती लव्हयापा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवुडमध्ये बेधडक या चित्रपटाच्या माध्यमातून आपले पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
अजय देवगनचा मुलगा अमन देवगनदेखील या वर्षी आपला डेब्यू करणार आहे. तो आझाद या चित्रपटात दिसणार आहे.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम खानचा सरजमीन हा चित्रपट येणार आहे. तो जानेवारी 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
राशा थडानी आझाद या चित्रपटात दिसणार आहे. ती प्रसिद्ध फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानी आणि रवीना टंडन यांची मुलगी आहे. आझाद चित्रपटात एका घोड्याची कहाणी दाखवण्यात आलेली आहे.