7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैमध्ये वाढणार पगार, जाणून घ्या किती वाढणार?
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल आणि पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर, जुलैपासून तुमच्या खात्यात जास्त पैसे येऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAICPI निर्देशांकानुसार, यावेळी सरकार डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.
जर तुम्हाला 38 टक्के दराने DA मिळत असेल, तर तुमचा DA 21,622 रुपये होईल. तसेच तुमचा पगार वार्षिक 27,312 रुपयांनी वाढेल.
तसेच एप्रिल, मे आणि जूनमध्ये 126 च्या वर राहिल्यास, सरकार 4 टक्क्यांनी डीए वाढवू शकते.
जुलै महिन्याच्या पगारात तुम्हाला वाढीव रक्कम थकबाकीसह मिळू शकते. तुमचा पगार किती वाढेल ते जाणून घेऊ...
तुमचा मूळ पगार रु 56,900 आहे. तर यानुसार तुम्हाला यावेळी 19,346 रुपये DA मिळत आहेत.