Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartik Aryan Covid Positive: अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (photo:kartikaaryan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. IIFA 2022 मध्ये कार्तिक हा सहभाग घेणार होता. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कार्तिकनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. (photo:kartikaaryan/ig)
कार्तिकनं त्याचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं, त्यामुळे कोरोनाला पण राहावलं नाही. ' (photo:kartikaaryan/ig)
कार्तिकला याआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. भूल भुलैय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण नंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. लवकर कार्तिकचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. (photo:kartikaaryan/ig)
कार्तिकचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. (photo:kartikaaryan/ig)
या चित्रपटामध्ये कार्तिकसोबतच कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारली. पहिल्या आठवड्यात भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं 92.05 कोटी एवढी कमाई केली. तर आठव्या दिवशी 6.52 कोटी आणि नवव्या वर्षी 11.35 कोटी कमाई या चित्रपटानं केली. (photo:kartikaaryan/ig)