Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
कमोडिटी बाजारात विक्रीचा ट्रेंड पाहायला मिळाला. शेअर बाजारानंतर सोने चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 739 रुपयांनी घसरला. सोन्याचा दर 75914 रुपये एक तोळा असा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज चांदी 2243 रुपयांनी घसरुन 88137 रुपये प्रति किलोवर आली. काल बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा दर 90380 रुपये होता.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज कपाती संदर्भातील कठोर भूमिकेचा परिणाम शेअर बाजार, चलन बाजार अन् सोने चांदीच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळालं.
भारताची राजधानी नवी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याचे दर 200 रुपयांनी घसरले. नवी दिल्लीत सोन्याचा दर 79100 रुपये एक तोळा असे होते. काल बाजार बंद झाला तेव्हा 10 ग्रॅम 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 79300 रुपये होता.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच दर 60 डॉलरनं कमी होऊन 2600 डॉलर्सवर पोहोचला. त्याचा परिणाम भारतातील सराफ बाजारावर देखील झाल्याचं पाहायला मिळालं.