Gold Rate Today : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
भारतीयांमध्ये सोने लोकप्रिय आहे. सर्वाधिक सोन्याचे ग्राहक असणाऱ्या देशांच्या चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केलं जातं. सोने दरांवर जागतिक बाजारातील बदल आणि विविध कर आणि शुल्क याचा परिणाम होत असतो. एमसीक्सवर सोने अन् चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाची राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81390 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 74660 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर 74500 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81230 रुपये इतका आहे.
बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 74500 रुपये इतका असून 24 कॅरेटचा एका तोळ्याचा दर 81230 रुपये आहे. मुंबईत देखील बंगळुरुप्रमाणं दर आहेत. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 81230 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेटचा दर 74500 रुपये इतका आहे.
पुणे, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 81230 रुपये आहे. तर,22 कॅरेट सोन्याचा दर 74500 इतका आहे.
अहमदाबाद आणि इंदौरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 74550 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 81280 हजार रुपये आहे. तर, लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 74650 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 81380 रुपये आहे.