Gold Rate Today : सोन्याच्या दरात 200 रूपयांची वाढ; तर चांदी झाली 500 रूपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर
चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आर्थिक मंदीची चाहूल या कारणामुळे भारतात तसेच जगभरात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 8 महिन्यांसाठी वाढले आहेत. त्यामुळे डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम देखील दरवाढीवर दिसून येतोय.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,020 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51,352 रूपयांवर व्यवहार करत आहे.
आज चांदीच्या दरात मात्र, घसरण पाहायला मिळतेय. एक किलो चांदीचा दर आज 68,630 रूपयांवर व्यवहार करत आहे.
लग्नसराईच्या काळात सोन्याचे दरही वाढल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
सोन्याकडे अनेकजण आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील पाहतात. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे गुंतवणुकीचा पर्य़ाय देखील सध्या मागे राहिला आहे.
मौल्यवान धातूंच्या किंमतीचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्ली आणि इतर अन्य ठिकाणीही काही अंशी सारख्याच दरात व्यवहार करतात.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.