Akola News: तब्बल 14 प्रकारचे रंगीबेरंगी गुलाब अन् बरंच काही; अकोल्यातील पुष्प प्रदर्शनाची बातच न्यारी
अकोलेकरांसाठी गेल्या आठवड्यातील रविवार कलरफुल ठरला. निमित्त होतं अकोला गार्डन क्लबनं आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनाचं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 49 वर्षांपासून अकोल्यात या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातंय.
अकोल्यातील खंडेलवाल भवनमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.
या पुष्प प्रदर्शनाचं खास आकर्षण होतं विविध रंगातले सुंदर गुलाब.
गुलाब... कँलेनडूला, स्वीट सुलतान, मारीगोल्ड, डेलिया, एक्झोरा, लँडोरा, रेड मास्टरपीस.... असे अनेक गुलाबाचे प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळाले.
विविधरंगात फुललेली सुंदर आणि मन मोहून टाकणारे गुलाब अकोल्यात एकाच ठिकाणी अकोलेकरांना पहायला मिळाले.
या प्रदर्शनात गुलाबांचे 14 प्रकार होते. तर फुलांचे तब्बल 152 प्रकार होते.
या पुष्प प्रदर्शनामध्ये तब्बल 748 प्रवेशिका म्हणजेच, एवढ्या प्रकारची फुलं आली होती.
अकोलेकरांनी हा गुलाबांच्या रंगांचा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.