Gold Rate Today : प्रतितोळा सोन्याचा दर 57 हजार, तर चांदी किंचित स्वस्त
आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्याचे दर नेहमी वर खाली होत असतात. सध्या जागतिक बाजारात डॉलरच्या मूल्यात घट झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागच्या एक आठवड्यापासून सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी आजचाही दिवस चांगला आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,030 रूपयांवर आहे.
आज एक किलो चांदीचा दर 66,890 रूपयांवर आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रूपयांची घट झाली आहे.
सोन्याचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राजधानी दिल्लीतही थोड्याफार प्रमाणात सारखेच आहेत.
आज आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आली आहे.
स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत. आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.