Farzi : शाहिद कपूरची 'फर्जी' कशी आहे? जाणून घ्या...
'फर्जी' या वेबसीरिजमध्ये समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या वेबसीरिजमध्येदेखील काळा पैसा, बनावट नोटा, राजकारणी मंडळींची विचारसरणी, आर्थिक विषमता अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'फर्जी' या वेबसीरिजमध्ये बनावट नोटा छापणारा व्यवसाय जवळून दाखवण्यात आला आहे.
'फर्जी' या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे.
'फर्जी' या वेबसीरिजच्या माध्यमातून जुना विषय नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एक थरार नाट्य या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
कथा, पटकथा, संवाद आणि कलाकरांच्या अभिनयाच्या जोरावर या वेबसीरिज ओटीटी विश्वात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
बनावट नोटांच्या व्यवसायात अडकलेल्या एका कलाकाराची कहाणी 'फर्जी' या वेबसीरिजमध्ये मांडण्यात आली आहे.
'फर्जी' या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूर, विजय सेतुपती, के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर मुख्य भूमिकेत आहेत.
'फर्जी' या वेबसीरिजचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.