IPO Update : EIE च्या 89 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओतून गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा, शेअर किती रुपयांवर?
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा शेअर बाजारात 29 नोव्हेंबरला लिस्ट झाला होत. या कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 148 रुपये निश्चित केला होता. लिस्टींगला गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा मिळाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स या कंपनीचा शेअर सध्या 324 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या या शेअरमध्ये तेजी आहे.
एनवायरोचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला होता तेव्हा तो 220 रुपयांना लिस्ट झाला होता.
शेअर लिस्ट झाल्यानंतर महिनाभरात त्यात 100 रुपयांची वाढ झाली असून सध्या शेअर बाजारात या कंपनीचा शेअर 324 रुपयांवर आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीकडून 650 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणण्यात आला होता.
गुंतवणूकदारांना 148 रुपयांना शेअर मिळाला सध्या तो 324 रुपयांवर ट्रेड होत असून गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. हा आयपीओ 89 पट सबस्क्राइब झाला होता. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)