आता 'हेल्दी ड्रिंक' सांगून बोर्नविटा विकता येणार नाही, सरकारचा निर्णय; ई-कॉमर्स कंपन्यांना दिला मोठा आदेश!
केंद्र सरकारने बोर्नविटासह (Bournvita) अन्य पेयांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बोर्नविटासह अन्य पेयांना हेल्दीड्रिंक म्हणता येणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या विभागाने सर्व ई-कॉर्मस कंपन्यांना बोर्नविटासह काही पेय पदार्थांना हेल्दी ड्रिंकच्या श्रेणीतून हटवण्याचा आदेश दिला आहे.
सरकारचा हा आदेश 10 एप्रिलपासून लागू करण्यात आलेला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने अशाच प्रकारचा एक निर्णय दिला होता.
FSSAI डेअरी प्रोडक्ट्स, माल्ट बेस्ड पेये यांना हेल्दी ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंकच्या श्रेणीतून हटवण्याचा आदेश ई-कॉमर्स कंपन्यांना दिला होता.
देशाच्या खाद्यविषयक कायद्यांत हेल्दीड्रिंकची व्याख्या करण्यात आलेली नाही. चुकीचे शब्द वापरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांनी बोर्नविटासह वेगवेगळ्या पेयांना हेल्दी ड्रिंकच्या श्रेणीतून हटवावे, असे सांगण्यात आले आहे.
हा निर्णय म्हणजे पेयनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना चांगलाच झटका असल्याचे म्हटले जात आहे.