Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
म्युच्यूअल फंड हा गेल्या काही वर्षांमधील गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. दीर्घकालीन वित्तीय ध्येय ठेवून यामध्ये गुंतवणूक करण्यात येते. राहुल गांधी यांनी 7 म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांनी 7 म्युच्यूअल फंडमध्ये 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्यूअल फंडचा समावेश आहे. इंडिया टुडेच्या एप्रिल 2024 मधील रिपोर्टनुसार राहुल गांधी यांनी एचडीएफसी स्मॉल कॅप रेग्यूलर (ग्रोथ)मध्ये अधिक पैशांची गुंतवणूक केलेली आहे. राहुल गांधींनी या फंडमध्ये 1.23 कोटी रुपये गुंतवले आहेत.आयसीसी प्रूडेंशिअल रेग्यूलर सर्व्हिस फंडमध्ये 1.02 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.
एचडीएफसी स्मॉल कॅप रेग्यूलर (ग्रोथ) याच्या एनएवीमध्ये 51.85 टक्क्यांची वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी एचडीएफसी हायब्रिड डेट फंडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ज्याचं मूल्य 79 लाख रुपये आहे.
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्चुनिटीज फंड- डायरेक्ट प्लॅन, आयसीआयसीआय प्रूडेंशिअल इक्विटी अँड डेट फंड ग्रोथ, पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडमध्ये प्रत्येकी 19-19 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी स्मॉल कॅप डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ)मध्ये राहुल गांधी यांनी 17 लाखांची गुंतवणूक केली आहे.
राहुल गांधी यांनी सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 2020-21 चे 220 यूनिट आहेत. ज्याची 15 मार्च 2024 पर्यंतची किंमत 15.21 लाख रुपये होती. पीपीएफमध्ये राहुल गांधी यांचे 61.52 लाख रुपये 15 मार्च 2024 पर्यंत होते. राहुल गांधींकडे 11.15 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती असून बँकेत 26.25 लाख रुपये शिल्लक 15 मार्चला होती, असं त्यांनी वायनाड लोकसभेसाठी अर्ज करताना भरलेल्या अर्जासोबतच्या शपथपत्रातून दिसून आलं. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)