Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात झालेत 'हे' महत्त्वाचे बदल, अनेक परंपरा बदलल्या; जाणून घ्या...
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक अंतरिम आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आलेले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणातही अनेक बदल झाले आहेत. यामध्ये पाच प्रमुख बदलांचा समावेश आहे. .
सर्वांत पहिला बदल हा 1956 साली झाला. याआधी भारताचा अर्थसंकल्प फक्त इंग्रजी भाषेत सादर केला जायचा. मात्र 1956 सालापासून हा नियम बदलण्यात आला. 1956 सालापासून अर्थसंकल्प हा हिंदी भाषेतूनही सादर करण्यात आला.
1998 सालापर्यंत अर्थसंकल्प रात्री पाच वाजता सादर करण्याची प्रथा होती. पण 1999 साली नियमांत बदल झाल्यानंतर अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाऊ लागला.
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात अर्थसंकल्पाशी निगडीत अनेक परंपरांमध्ये बदल केला. अगोदर अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा. 2017 सालापासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर केला जाऊ लागला.
2016 सालापर्यंत रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प वेगवगळे सादर केले जायचे. पण 2016 सालापासून हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र सादर केले जाऊ लागले. 2017 सालापासून रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात नाही.
याआधी अर्थसंकल्पाला लाल ब्रिफकेसमधून आणले जायचे. पण आता अर्थसंकल्प पेपरलेस करण्यात आला आहे. 2021 सालापासून अर्थसंकल्प पेपरलेस सादर केला जातो.