Budget 2023: अर्थसंकल्पाच्या बहिखात्याप्रमाणेच अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंग; देशाच्या भविष्याचा लेखाजोगा बहिखात्यात बंद
यंदाचा मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 'बही खाता' घेऊन संसदेत दाखल झाल्या. अर्थमंत्री आज लाल रंगाच्या साडीत दिसल्या.
काही वेळापूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे.
जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.