Budget 2022: बजेट बनवणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या टीममध्ये आहे तरी कोण-कोण? जाणून घ्या
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत बजेटचा मोठा वाटा आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प तयार करण्यासाठी तज्ज्ञांची टीम मदत करत असते. यामध्ये अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असतो. यावेळी २०२२मध्ये बजेट बनवणाऱ्या टीममध्ये कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही सोमनाथन यांना आर्थिक बाबींचा मोठा अनुभव आहे. जागतिक बँकेत सोमनाथन काम केलेलं असून 2015 मध्ये पीएमओमध्ये सहसचिव म्हणूनही काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. अर्थसचिव या नात्याने यावेळी अर्थव्यवस्थेत वाढीसह मागणी वाढेल असा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान आहे.
अजय सेठ यांची गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आर्थिक व्यवहार सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सेठ यांना कर्नाटकमधील बजेट आणि व्यावसायिक करांचा मोठा अनुभव आहे. आर्थिक एकत्रीकरणासोबतच विकासाला गती देणारे बजेट तयार करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.
देबाशीष पांडा हे वित्तीय सेवा विभागाचे सचिव आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांमधील सुधारणांच्या पुढील पिढीचा पाया रचण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बॅड बँक बनवण्यातही त्यांचा मोठा हात असल्याचे बोललं जाते. या अर्थसंकल्पातही सुधारणांचा रोडमॅप तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे.
महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज हे अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वी ते पीएमओ मध्ये कार्यरत होते. नंतर त्यांची महसूल विभागात बदली झाली. कोरोनाने त्रस्त असलेल्या लोकांना करात सवलत देण्यावर त्यांचा भर असल्याचे बोलले जात आहे.
गुंतवणूक विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी एअर इंडियाच्या खाजगीकरणात मोठी भूमिका बजावली आहे. सरकारची यंदाच्या निर्गुंतवणुकीची यादी बरीच मोठी आहे. निर्गुंतवणुकीबाबत सरकारचे धोरण मांडण्यासाठी पांडे सीतारामन यांना मदत करतील, असे मानले जात आहे.