Agriculture Budget 2024 : अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं जाणून घेऊया..
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष होतं. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्यात आले आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केला आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
आत्तापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचा फायदा झाला आहे. तर 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं आहे. तर 390 कृषी विद्यापीठं सरकारनं सुरु केली आहेत. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)
सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. (Photo credit : Facebook/Nirmala Sitharaman)