Union Budget 2024 : बजेट टीमसोबत अर्थमंत्र्यांचं फोटो सेशन!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (1 फेब्रुवारी) रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. (Photo : PTI)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता पटलावर ठेवतील. (Photo : PTI)
मोदी सरकारच्या काळातील हा दहावा अर्थसंकल्प असणार आहे. (Photo : PTI)
2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. (Photo : PTI)
काय स्वस्त होणार, काय महाग होणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. (Photo : PTI)
देशात अर्थसंकल्प मांडायची परंपरा ही ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे अर्थसंकल्पाचा इतिहास हा खूप मोठा आहे. (Photo : PTI)
1860 रोजी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पापासून सुरू झालेला हा प्रवास आतापर्यंत येऊन पोहोचला आहे. या दरम्यान त्यामध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून येतंय. (Photo : PTI)
स्वतंत्र भारताचा हा 76वा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. (Photo : PTI)
स्वतंत्र भारतात, 2024 पूर्वी 75 सामान्य अर्थसंकल्प, 14 अंतरिम अर्थसंकल्प आणि चार विशेष अर्थसंकल्प किंवा मिनी बजेट सादर केले गेले आहेत. (Photo : PTI)