Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Union Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (1 फेब्रुवारी) सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. (Photo : ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. (Photo : ANI)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. (Photo : ANI)
2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली. (Photo : ANI)
येथे राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. (Photo : PTI)
मोदी सरकारच्या काळातील हा दहावा अर्थसंकल्प असणार आहे. (Photo : PTI)
2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. (Photo : PTI)
काय स्वस्त होणार, काय महाग होणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. (Photo : PTI)
स्वतंत्र भारताचा हा 76वा सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे. (Photo : PTI)
स्वतंत्र भारतात, 2024 पूर्वी 75 सामान्य अर्थसंकल्प, 14 अंतरिम अर्थसंकल्प आणि चार विशेष अर्थसंकल्प किंवा मिनी बजेट सादर केले गेले आहेत. (Photo : PTI)