मोठी बातमी! दागिने तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीचा आयपीओ येणार, पैसे कमवण्याची मिळणार मोठी संधी; जाणून घ्या सर्वकाही
BlueStone Jewellery IPO: ज्वेलरी आणि लाइफस्टाइल ब्लुस्टोन ज्वेलरीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे पेपर्स जमा केले आहेत.
हा आयपीओ आल्यास कंपनी एकूण 1000 करोड़ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. यासह 2.4 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्सही ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकण्यात येतील.
ही कंपनी मुळची बंगळुरूची असून 2011 साली हा ब्रँड समोर आला. ही कंपनी देशातील प्रमुख ज्वेलरी रिटेल कंपन्यांपैकी एक आहे.
या कंपनीचे मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट्स मुंबई, सुरत, जयपूर या तीन शहरांत आहेत. वित्त वर्ष 2023 मध्ये या कंपनीचा महसूल 770.73 कोटी रुपये होता. 2024 साली या महसुलात 64.24 टक्क्यांनी वाढ झाली. हा महसूल 2024 साली 1,265.84 कोटी रुपयांपर्यंत वाढला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो