पाच दिवसांत पैसेच पैसे! 'हे' पाच स्टॉक देणार बम्पर रिटर्न्स; जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस काय?
Stock to Buy: गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे स्टॉक्स शोधत आहेत. ब्रोकरेज हाउस शेअरखानने (Sharekhan) शॉर्ट-टर्म गुंतवणुकीच्या उद्देशाने सर्वोत्तम पाच स्टॉक्स सुचवले आहेत. शेअरखानने सूचवलेल्या या स्टॉक्समध्ये आगामी 5 ते 15 दिवसांच्या उद्देशाने गुंतवणूक करता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअरखान या ब्रोकरेज फर्मने Ambuja Cements या शेअरमध्ये शॉर्ट-टर्मच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाी 654/666 रुपयांचे टार्गेट तर 614 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवायला हवा. तर एन्ट्री प्राईज रेंज ही 634.10 रुपयांची ठेवण्याचा सल्ला शेअरखानने दिला आहे. 1 ते 5 दिवसांसाठी या कंपनीत गुंतवणूक करता येईल, असे शेअरखानने म्हटले आहे.
SJVN या शेअरलादेखील Sharekhan ने शॉर्ट-टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 135.90/145 रुपयांचे टार्गेट तर 1.90 रुपयांचा स्टॉपलॉस आणि एंट्री प्राइज रेंज ही 128.83 रुपये असावी, असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. आगामी 1 ते 15 दिवसांसाी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असे शेअरखानने सूचवले आहे.
शेअरखानने GSPL या कंपनीचे शेअरही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर शॉर्ट टर्मसाठी 437.40/465 रुपयांचे टार्गेट तर 392 रुपयांचा स्टॉपलॉस आणि 414.95 रुपयांची एन्ट्री प्राईज रेंज ठेवायला हवी, असे शेअरखानने म्हटले आहे. 1 ते 15 दिवसांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल.
Asian Paints हा शेअरदेखील शॉर्ट टर्मसाठी चांगला परतावा देऊ शकेल, असे Sharekhan ने सूचनले आहे. त्यासाठी 3419/3549 रुपयांचे टार्गेट, 3199 रुपयांचा स्टॉपलॉल ठेवायला हवा. तसेच 3304.90 रुपयांची एन्ट्री प्राईज रेंज असावी, असे या ब्रोकरेज फर्मने सूचवले आहे. आगामी 1 ते 15 दिवसांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असे शेअरखान या ब्रोकरेज फर्मने सूचवले आहे.
शॉर्ट टर्मसाटी IDFC हा शेअरदेखील चांगला असल्याचे Sharekhan ने सूचवले आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 116/118 रुपयांचे टार्गेट तर 110 रुपयांचा स्टॉपलॉस तसेच 113.10 रुपयांची एंट्री प्राइस रेंज ठेवायला हवी, असे शेअरखानने म्हटले आहे. पुढच्या 1 ते 5 दिवसांसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल, असे शेअरखानने सुचवले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)