पुढच्या दिवाळीत पैशांचा पाऊस? 'हे' पाच स्टॉक 5 वर्षांत देणार50 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स
Diwali 2024 Picks: सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने पुढच्या दिवाळीपर्यंत चांगला परतावा देऊ शकरणारे काही शेअर्स सुचवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने IFCI या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुचवले आहे. 61 - 56 रुपयांच्या रेंजमध्ये हा शेअर खेरदी करावा. तसेच 44 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा. यासह 80 रुपयांचे पहिले तर 88 रुपयांचे दुसरे टार्गेट ठेवायला हवे, असे आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे. हा स्टॉक पुढच्या दिवाळीपर्यंत साधारण 50 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने IRB Infra या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 60-55 रुपयांच्या रेंजमध्ये हा शेअर खरेदी करावा. तसेच 43 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर 79 रुपयांचे पहिले टार्गेट आणि 86 रुपयांचे दुसरे टार्गेट ठेवायला हवे, असे आनंदराठी सिक्योरिटीजने सुवले आहे. हा शेअर पुढच्या दिवळीपर्यंत साधारण 50 टक्क्यांच्या आसपास रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने Jupiter Wagons या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 525 -495 रुपयांची रेज तसेच 390 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवा. सोबतच 700 रुपयांचे पहिले तर 760 रुपयांचे दुसरे टार्गेट ठेवायल हवेत, असे आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
Hindustan Zinc या कंपनीत गुंतवण्याचा सल्ला आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. हा शेअर 520 - 480 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करता येईल. तसेच 380 रुपयांचा स्टॉपलॉस आणि 680 रुपयांचे पहिले तर 750 रुपयांचे दुसरे टार्गेट ठेवायला हवे, असे आनंदराठी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)