Garud Puran : मृत्यूबाबत गरुड पुराण काय सांगते? मृत्यूआधीचे 6 संकेत कोणते?
गरुड पुराणानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा आपल्या कर्माप्रमाणे होतो.मृत्यूच्या आधी तुम्हाला जर हे 6 संकेत मिळाले तर समजून जा की तुमचा मृत्यू जवळ आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरुड पुराणात मृत्यूशी संबंधित काही संकेत देण्यात आले आहेत. या संकेतांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला आपल्या मृत्यूचा आभास होऊ शकतो. हे संकेत नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
गरुण पुराणानुसार, कोणत्याही व्यक्तीला डोळ्यांपासून ते नाकाच्या पुढचा भाग दिसत नसेल तर याचा अर्थ तुमचा मृत्यू जवळ आला आहे असा होतो.
जर एखाद्या व्यक्तीला दिवा विझवल्यानंतर कोणत्याच प्रकारचा वास येत नसेल तर समजून जा की तुमच्या आयुष्यातली अवघी काहीच वर्ष शिल्लक आहेत.
गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे, दोन्ही कानात बोट घातल्यानंतर जर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा आवाज येत नसेल तर तुमचा मृत्यू जवळ आला आहे.
गरुड पुराणात असंही म्हटलं आहे की, जेव्हा उन्हातही तुम्हाला तुमची सावली दिसत नसेल तर याचा अर्थ तुमच्या मृत्यूची तारीख जवळ आली आहे.
घरातून बाहेर पडताच जर कुत्रा तुमच्या मागे पडत असेल तसेच हा प्रकार सलग 4 दिवस तुमच्याबरोबर होत असेल तर तुमचा मृत्यू कधीही होऊ शकतो.
गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे, मृत्यूच्या आधी व्यक्ती जर उलटा श्वास घेत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)