दिवाळीचा धमाका! फक्त एका वर्षांसाठी पैसे गुंतवा 'हे' पाच स्टॉक पाडतील पैशांचा पाऊस?
Diwali 2024 Picks : सध्या देशभरात सण-उत्सावाचे वातावरण आहे. दुसरीकडे शेअर बाजारात चढउतार-पाहायला मिळतोय. अशा स्थितीत निर्मल बंग (Nirmal Bang) ब्रोकरेज फर्मने 'दिवाळी पिक' म्हणून खास पाच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सूचवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जवळपास 80 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असा दावा निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने केला आहे.
Archean Chemical Industries या शेअरला निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 823 रुपये प्रति शेअर ठेवायला हवी, असं या ब्रोकरेज फर्मने सांगितलं आहे. 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 622 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 32 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Fineotex Chemical या शेअरमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करायची असेल तर 483 रुपये प्रति शेअर एवढे टार्गेट ठेवायला हवे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 381 रुपयांवर होता. आगामी दिवाळीत हा शेअर 27 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याची शक्यता आहे.
निर्मल बंग या फर्मने Five-Star Business या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 1165 रुपये प्रति शेअर ठेवाला हवे, असे या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 853 रुपयांवर बंद झाला होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 36 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो.
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Garware Hi-Tech या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 4800 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवायला हवी. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3665 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 31 टक्क्यांनी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
निर्मल बंग या ब्रोकरेज फर्मने Jyoti Resins या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 1786 रुपये प्रति शेअर हे टार्गेट निर्मल बंगने सुचवले आहे. 22 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1456 रुपयांवर होता. आगामी दिवाळीपर्यंत हा शेअर 23 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देऊ शकतो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)