Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झोमॅटो शेअर पाडणार पैशांचा पाऊस, भविष्यात देणार जबरदस्त रिटर्न्स; स्टॉपलॉस अन् टार्गेट काय?
Zomato Share Price: सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी झोमॅटो (Zomato ) या कंपनीचा शेअर आगामी काळात चांगलाच वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्लोबल ब्रोकरेज हाउस जेपी मॉर्गनने (JP Morgan ) झोमॅटो शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
झोमॅटोचा शेअर खरेदी करत अशाल तर त्यासाठी टार्गेट प्राईज 208 रुपयांवरून 340 रुपये करावे, असे जेपी मॉर्गनने सुचवले आहे.
गुरुवारी झोमॅटो कंपनीचा शेअर 5 सप्टेंबर 2024 रोजी 4.94 टक्क्यांनी वाढून 254.85 रुपयांवर स्थिरावला होता.
जेपी मॉर्गनने झोमॅटो हा शेअर ओव्हरवेट या कॅटेगिरीत टाकला असून डिसेंबर 2025 पर्यंत या शेअरची टार्गेट प्राईज 340 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
विदेशी ब्रोकरेज हाउस सीएलएसए यानेदेखील झोमॅटो शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सीएलएसएने झोमॅटो शेअर खरेदी करताना 353 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
2024 साली गेल्या आठ महिन्यांत या शेअरमध्ये 106 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तीन वर्षांत हा शेअर 160 रुपयांनी तर 2 वर्षांत हा शेअर 327 टक्क्यांनी रिटर्न देऊ शकला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)