Hartalika Teej 2024 : हरतालिकेच्या दिवशी पारण कधी आणि कसं करावं? जाणून घ्या पारण विधीचा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, आज हरतालिकेचा व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरतालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर (Lord Shiva) आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.
हरतालिका व्रताच्या दिवशी पारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं.
अनेक महिला प्रदोष काळात भगवान शंकर आणि माता पार्वतीची विधीवत पूजा केल्यानंतर व्रताचं पारण करतात. तर, काही महिला चतुर्थी तिथीला सूर्योदयानंतर व्रत पारण करतात.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी आज दुपारी 3 वाजून 01 मिनिटांनी सुरु होईल.
6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.
तसेच, संध्याकाळी प्रदोष काळा पूजा केली जाणार आहे. यासाठी 7 सप्टेंबर रोजी सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)