Sai Lokur: अभिनेत्री सई लोकूरच्या लेकीला पाहिलं का?
सईनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील सई, मेघा धाडे आणि पुष्कर जोग या तिघांच्या मैत्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
. सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या टॉप-5 स्पर्धकांपैकी एक होती.
सईनं कुछ तुम कहो कुछ हम कहे,पकडा गया, मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म, पारंबी ,आम्हीच तुमचे बाजीराव, कीस किसको प्यार करू या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्याच सीझनमध्ये शोच्या अंतिम फेरीपर्यंत तिने बाजी मारली होती. कलाविश्वात यश मिळवल्यावर सईने वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या ३ वर्षांनंतर म्हणजेच १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने तिच्या बाळाचं स्वागत केलं.
सई लोकूरने तिच्या लाडक्या लेकीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. ताशीबद्दल अनेक गोष्टी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.
मात्र, आजवर तिने लेकीचा चेहरा माध्यमांसमोर कधीच उघड केला नव्हता.
स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधत सई लोकूरने आपल्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लेकीबरोबर सुंदर असा फोटो शेअर करत सईने खास पोस्ट देखील लिहिली आहे.(pc:sai.lokur/ig)