देशातल्या 'या' दिग्गज बँकेचं कर्ज महागलं, घेतला महत्त्वाचा निर्णय!
एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एचडीएफसी बँकने आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएचडीएफसीने वाढवलेला हा व्याज दर 8 ऑगस्टपासून लागू झाला आहे. बँकेने या निर्णयाची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. बँकेने तीन महिन्यांसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये पाच बेसिस पॉइंट्समध्ये वाढ केली आहे.
वेगवेगळ्या कर्जाच्या अवधीसाठी वेगवेगळा एमसीएलआर रेट असेल. हा एमसीएलआर रेट 9.10 टक्क्यांवरून 9.45 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ओव्हरनाईट कर्जासाठी एमसीएलआर रेट 9.10 करण्यात आला आहे. एका महिन्याच्या कर्जावर एमसीएलआर रेट 9.15 टक्के करण्यात आला आहे. तीन महीन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर दर 9.25 ते 9.30 टक्क्यांपर्यंत 5 बेसेस पॉइंट्सपर्यंत वाढवला आहे. .
सहा महिन्यांचा एमसीएलआर 9.40 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाचा MCLR दर 9.45 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षे किंवा तीन वर्षांच्या कर्जासाठी एमसीएलआर रेट 9.45 करण्यात आला आहे.
एमसीएलआर दर वाढला की शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज तसेच अन्य कर्जावरील ईएमआय वाढतो.
सांकेतिक फोटो