Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डने शॉपिंग करताय? 'या' चुका टाळा, अन्यथा वाढतील अडचणी!
Credit Card Tips: आता देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जात आहे. त्यानंतर लगेच दसरा, दिवाळी, नवरात्री असे सण येतील. या सणांच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसं पाहायचं झालं तर क्रेडिट कार्डच अनेक फायदे आहेत. मात्र याच क्रेडिट कार्डला योग्य पद्धतीने न वापरल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. याच पार्श्वभूमीवर क्रेडिट कार्डचा कसा वापर करायला हवा? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? हे जाणून घेऊ या..
सणासुदीच्या काळात अनेकजण कोणताही विचार न करता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करतात. मात्र क्रेडिट कार्डच्या मदतीने प्रमाणापेक्षा जास्त शॉपिंग करू नये. सणांसाठी शॉपिंग करत असाल तर अगोदर तुमचे बजेट ठरवले पाहिजे. त्यानंतरच शॉपिंग केली पाहिजे.
प्रत्येक क्रेडिट कार्डची लिमिट ठरवून दिलेली असते. मात्र सणासुदीच्या काळात अनेकजण क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 70 ते 80 टक्के रुपये खर्च करतात. असं केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. क्रेडिट कार्डचा वापर लिमिटच्या 30 टक्केच राहील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डचे बील येते. प्रत्येक महिन्याच्या बील डेटला लक्षात घेऊनच तुम्ही शॉपिंग केली पाहिजे. हा विचार न केल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डचे बील देताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त रिवॉर्ड्स मिळावेत म्हणून अनेकजण क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करतात. मात्र रिवॉर्ड्सच्या मोहात पडू नये. तसे केल्यास भविष्यात तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबण्याची शक्यता असते. गरजच्या वस्तूंचीच नेहमी शॉपिंग करावी.
सांकेतिक फोटो