Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Multibagger Stocks: 'या' मेटल स्टॉकचा मिळतोय सॉलिड रिटर्न; 10 हजार रुपयांचे झालेत 9 लाख
राजरतन ग्लोबल वायर ही मेटल कंपनी आहे. कंपनीकडे विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्या ड्रॉ स्टील वायर्सचं उत्पादन करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीचे बहुतांश ग्राहक हे प्रामुख्यानं ऑटोमोबाईल, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. ही सध्या 3,780 कोटी mcap असलेली स्मॉलकॅप कंपनी आहे.
राजरतन ग्लोबल वायरची गणना शेअर बाजारातील सर्वोत्तम मल्टीबॅगर शेअर्समध्ये केली जाते. सध्या एका शेअरची किंमत 746.90 रुपये आहे.
गेल्या पाच दिवसांत हा शेअर जवळपास स्थिर आहे. एका महिन्यातही विशेष फरक पडलेला नाही आणि त्यात केवळ 1 टक्के वाढ झाली आहे, तर 6 महिन्यांत 3 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या वर्षभरात हा शेअर 35 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, लॉन्ग टर्ममध्ये या शेअरनं धमाकेदार कामगिरी केली आहे.
राजरतन ग्लोबल वायरच्या शेअर्सची किंमत गेल्या 3 वर्षांत 1500 टक्के आणि गेल्या 5 वर्षांत 1900 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे.
उदाहरण देऊनच बोलायचं झालं तर, एखाद्यानं दशकापूर्वी त्याच्या शेअर्समध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते, तर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य आज 9 लाख रुपये झालं असतं.
टीप : इथे सांगण्यात आलेल्या बाबी या केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. इथे हे नमूद करणं महत्त्वाचं आहे की, बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. ABPLive.com कधीही कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.
image 9