Best Mileage CNG cars : इंधन दरवाढीतही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बेस्ट CNG कार
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वजण चिंतेत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे गाडी फिरवणे देखील महाग झालं आहे. त्यात अनेक जण नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात आहेत मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे द्विधा मन:स्थितीत आहेत. अशांसाठी इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार असे दोन पर्यात समोर आहेत. इलेक्ट्रिक कार थोड्या महाग आहेत. अशा परिस्थितीत, सर्वोत्तम पर्याय म्हणजे सीएनजी कार. सीएनजी कार पेट्रोल किंवा डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देतात. तसेच फार कमी प्रदूषण करतात. आज टॉप सीएनजी कारबद्दल जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) : पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये सीएनजी हॅचबॅक 1.0-लिटर इंजिन आहे जे 57 पीएस पॉवर आणि 78 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी मॉडेल 30.47 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट VXI आणि VXI (O) ट्रिम्समध्ये उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 5,95,000 रुपये आहे.
ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro) : नवीन पिढीच्या ह्युंदाई सॅन्ट्रो Magna (मॅग्ना) आणि Sportz (स्पोर्टझ) ट्रिममध्ये सीएनजी पर्यायासह उपलब्ध. Hyundai Santro ला 1.2-लीटर 4-सिलिंडर इंजिन मिळते. नवीन सँट्रोचे सीएनजी व्हेरिएंट 60 पीएस पॉवर आणि 85 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी मॉडेल 30.48 किमी/किलोचे मायलेज देते. या कारची सुरुवातीची किंमत 5,99,900 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) : मारुती सुझुकी वॅगनआर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. ही कार सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. 1.0-लीटर 3-सिलेंडर इंजिन CNG WagonR मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी कार 32.52 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट LXI आणि LXI (O) ट्रिममध्ये उपलब्ध आहे. वॅगनआर कारची किंमती 5,70,500 रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) : मारुती सुझुकीकडे अनेक सीएनजी कार आहेत. अल्टो हे त्याचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. अल्टो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. अल्टोला 0.8-लिटर इंजिन मिळते. सीएनजीवर चालणारी अल्टो 40 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरिएंट 31.59 किमी/किलोचे मायलेज देते. अल्टो हॅचबॅक सीएनजी व्हेरिएंट LXI आणि LXI (O) ट्रिम्समध्ये येते. या कारची किंमत 4,66,400 लाखांपासून सुरू होते.