ATM Withdrawal : एटीएममधून पैसे निघाले नाहीत पण खात्यातून रक्कम कापली गेली? अशी मिळवा तुमची रक्कम
एटीएममधून अनेक वेळा रोख रक्कम काढताना खात्यातून पैसे कापले जातात, परंतु पैसे मिळत नाही. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पैसे मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत अनेकदा ग्राहकाला मनस्ताप होतो आणि पैसे कापले गेल्याने तो चिंतेत राहतो.
तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर आरबीआयचे अशा प्रकरणांबाबत काही नियम आहेत, हे कायम लक्ष असू द्या.
आरबीआयनुसार, जर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील आणि एटीएममधून पैसे निघाले नसतील तर, अशा परिस्थितीत बँककडून पुढील पाच दिवसांत तुमचे कापलेले पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील.
पुढील पाच दिवसांत बँकेने डेबिट केलेले पैसे परत न केल्यास अशा परिस्थितीत ग्राहकाला दररोज 100 रुपये दंड अतिरिक्त द्यावे लागतील.
यासोबतच आरबीआयने ग्राहकांना सल्लाही दिला आहे की, जर त्यांच्या खात्यातून चुकीच्या पद्धतीने पैसे कापले गेले असतील तर काळजी करू नका.
अशा वेळी सर्व प्रथम तुम्ही तुमच्या या व्हवहाराची बँकेला माहिती द्या. यासोबतच तुमच्या एटीएम व्यवहारांची पावती जपून ठेवा.
तक्रार दाखल करूनही बँक पैसे परत करत नसेल तर तुम्ही बँकेच्या अंतर्गत लोकपालाकडे तुमची तक्रार करू शकता.
तुम्ही येथे झालेल्या सुनावणीत समाधानी नसल्यास, तुम्ही RBI च्या ग्राहक निवारण यंत्रणेकडे जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.
याशिवाय, तुम्हाला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्याचा पर्यायही आहे.