Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशिबाला मिळणार कलाटणी, होणार अपार धनलाभ
नवीन वर्षाचा चौथा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. नवीन आठवडा 5 राशींच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, आरोग्यासाठी भाग्याचा ठरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील. तसेच, तुमच्या करिअरचा चांगला विस्तार होईल. या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे सुरु करु शकता.
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्हाला कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं. तसेच, तुमच्या टार्गेटवर फोकस करावा. या काळात नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळवता येईल. तसेच, तुमच्या सुख-दुखात तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. मित्रांबरोबर भेटीगाठीचे योग येणार आहेत. तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)